Kolhapur मोकाट कुत्र्यांची संख्या कुंभोजमध्ये वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur
मोकाट कुत्र्यांची संख्या कुंभोजमध्ये वाढली

Kolhapur : मोकाट कुत्र्यांची संख्या कुंभोजमध्ये वाढली

कुंभोज : येथे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. या मोकाट कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर लहान मुलांना एकटे घराबाहेर पाठविणे धोक्याचे वाटत आहे. रात्री कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकण्याने ज्येष्ठ नागरिकांची झोप उडून त्यांना निद्रानाशाचा त्रास उद्‍भवत आहे. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

ग्रामपंचायत हद्दीत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. विशेष करून हे कुत्रे लहान मुलांवर धावून जात आहेत. तसेच पहाटे अंधारात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांवर कुत्रे धावून जातात, तसेच मागे लागतात. त्यामुळे त्यांनाही घराबाहेर पडताना या कुत्र्यांची दहशत जाणवते. रात्री ते जोरजोरात भुंकत असल्याने काहींना निद्रानाश होत आहे. या अशा उपद्रव माजवणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एका संस्थेची नेमणूक केली होती. त्यांचे पथक गाडी घेऊन गावातील मोकाट कुत्री पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून देते. त्यामुळे पुन्हा ही मोहीम राबवावी.
- अभिजित जाधव, माजी उपसरपंच, कुंभोज.