शिक्षकांची असंख्य पदे रिक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांची असंख्य पदे रिक्त
शिक्षकांची असंख्य पदे रिक्त

शिक्षकांची असंख्य पदे रिक्त

sakal_logo
By

शिक्षकांची असंख्य पदे रिक्त
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील चित्र
राजू मुजावर : सकाळ वृत्तसेवा
कुंभोज, ता.२ ः जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सतत घटत असल्याचे चित्र आहे. ती वाढवण्यासाठी शासनासह शिक्षण विभागाकडूनही विशेष असे प्रयत्न होताना दिसून येत नाही. मात्र, ही विद्यार्थी संख्या घटण्याचे प्रमुख कारण म्हणजे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची शेकडो रिक्त पदे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसेल तर जिल्हा परिषद शाळेऐवजी खासगी शाळेकडे पालकांचा ओढा कायम असणार आहे. मात्र, यात गरिबांच्या पोरांच्या शिक्षणाचे हाल होत असल्याचे विदारक चित्र आहे.
तालुक्यात प्रत्येक गावांमध्ये खेड्यामध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. खेड्यातील मुलांची शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी शासनाकडून या जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू केल्या. शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. मात्र, मागील काही दशकापासून जिल्हा परिषद शाळेतील मुलांची संख्येत कमालीची घट झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे गावोगावी खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पालकांना आकर्षित करून विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा, दर्जेदार शिक्षण दिले जाते; मात्र अनेक शाळांकडून पालकांच्या खिशावर मोठा डल्ला मारला जातो. मात्र, तरीही ज्या पालकांची आर्थिक स्थिती उत्तम आहे, असे पालक बालवाडीपासून पाल्याची वर्षाला हजारो रुपये भरून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवतात, तर दुसरीकडे आजही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा कायम आहे. खेड्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकांकडून पाल्यांचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेतात. मात्र, या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शेकडो शिक्षकांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या अहवालानुसार तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची एकूण ६२० पदे मंजूर आहेत. मात्र, तालुक्यात ५६५ शिक्षक हजर आहेत. ५५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दुसरीकडे तालुक्यात १२ केंद्रप्रमुखांची पदे आहेत, मात्र प्रत्यक्षात केवळ एकच केंद्रप्रमुख अखंड तालुक्यात कार्यरत आहे. याशिवाय ७५ मुख्याध्यापकांची पदे मंजूर असून, ४० मुख्याध्यापक तालुक्यात हजर आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांचा फटका हा शाळेच्या पटसंख्या घटण्यावर होत आहे. त्यामुळे प्रशासनासह शासनाकडून ही रिक्त पदे कधी भरली जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
----------
जिल्हा परिषद शाळांमधील स्थिती
-पद-मंजूर-हजर-रिक्त
-केंद्रप्रमुख-१२-१-११
-मुख्याध्यापक-७५-४०-३५
-शिक्षक-६२०-५६५-५५