भाजीपाल्यांचे दर कडाडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजीपाल्यांचे दर कडाडले
भाजीपाल्यांचे दर कडाडले

भाजीपाल्यांचे दर कडाडले

sakal_logo
By

भाजीपाल्यांचे दर कडाडले
कुंभोज, ता. २ ः सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाल्याने अनेक शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. हाती आलेले पीकही परतीच्या पावसाने पाण्यात गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यंदा फळभाजी, तसेच पालेभाजी पिकांना पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने या पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळेच आता आवक घटल्याने दर वाढले आहेत.
भाजीपाल्याच्या दरात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला अजून एक महिना कात्री लागणार आहे. घरगुती बजेट बिघडले आहे. सध्या वांगी १२०, गवारी १२०, वरणा ८०, दोडका ८०, टोमॅटो ६० रुपये प्रतिकिलो दर आहे. मेंथी व कोथिंबीर पेंडी जोडीसाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत.