बाहुबलीत मंगळवारी रथयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाहुबलीत मंगळवारी रथयात्रा
बाहुबलीत मंगळवारी रथयात्रा

बाहुबलीत मंगळवारी रथयात्रा

sakal_logo
By

बाहुबलीत उद्या रथयात्रा
कुंभोज ः बाहुबली येथील बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ या संस्थेचा ८८ वा वार्षिकोत्सव व रथयात्रा मंगळवारी (ता. ८) आहे. बाहुबली विद्यापीठाच्या शाखांतर्गत दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आयोजित केला आहे. सकाळी आठला रथयात्रा महोत्सव, नऊला बाहुबली बृहन्मूर्ती प्रांगणात पंचामृत अभिषेक, दहाला आचार्यश्री शांतिसागर प्रवचन हॉलमध्ये सभा समारंभ आहे. कोल्हापूरचे प्रसिद्ध उद्योजक सुरेंद्र जैन अध्यक्षस्थानी असतील. तेजस दोशी, शांतिनाथ पाटील, मजले प्रमुख अतिथी आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ, बाहुबली या संस्थेने केले आहे.