ऊस वाहनांना हवा गतीचा ब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस वाहनांना हवा गतीचा ब्रेक
ऊस वाहनांना हवा गतीचा ब्रेक

ऊस वाहनांना हवा गतीचा ब्रेक

sakal_logo
By

ऊस वाहनांना हवा गतीचा ‘ब्रेक’
कुंभोज परिसरातील चित्र; कर्णकर्कश आवाजात गीते, हॉर्न
राजू मुजावर : सकाळ वृत्तसेवा
कुंभोज, ता. ८ ः सध्या सर्वच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. ऊस वाहने घेऊन जाणारे चालक कर्णकर्कश आवाजात गीते लावण्यासह मोठ्या प्रमाणावर हॉर्न वाजवत आहेत. गावातील भरवस्तीबरोबरच मुख्य बाजारपेठेतून जात असल्याने या वाहनांना मर्यादित वेग हवा असून अतिवेगाने वाहने हाकणाऱ्या चालकांवर कारवाईसह समज देण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागात ऊस तोडणी कामाला चांगलीच गती आली आहे. कुंभोजसह दुर्गेवाडी, हिंगणगाव, नेज, शिवपुरी, नरंदे परिसरात बैलजोडीसह ट्रॅक्टर-ट्रॉलीने उसाची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे ऊस वाहनांची दिवस-रात्र वर्दळ वाढली आहे. प्रमाणाहून अधिक ऊस भरून ही वाहने सुसाट जात आहेत. त्यामुळे नागरिकांसह लहान मुले, महिला व पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या बऱ्याच वाहनांना रिफ्लेक्टर्स नाहीत. अशी वाहने रात्री रस्त्यावर मध्येच थांबवून ऊस वाहतूक चालक अन्यत्र जात आहेत. त्यामुळे रात्री येणाऱ्या दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांना त्याचा धोका वाढला आहे. अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.
----------
सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. विद्यार्थ्यांसह पादचारी व नागरिकांची रस्त्यावर सातत्याने वर्दळ आहे. खराब रस्त्यावरून ऊस वाहने सुसाट जात असल्यामुळे धोका वाढला आहे.
-अमोल गावडे, ग्रामस्थ, कुंभोज