कुंभोजमध्ये गॅस्ट्रोसदृश रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभोजमध्ये गॅस्ट्रोसदृश रुग्ण
कुंभोजमध्ये गॅस्ट्रोसदृश रुग्ण

कुंभोजमध्ये गॅस्ट्रोसदृश रुग्ण

sakal_logo
By

कुंभोजमध्ये गॅस्ट्रोसदृश रुग्ण
आशा, आरोग्यसेविकांमार्फत संभाव्य ठिकाणी सर्व्हे
कुंभोज, ता. १७ ः कुंभोजसह दुर्गेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये उलटी, तसेच जुलाब लागण्याचे प्रमाण वाढले आहे. गावातील बहुतांश खासगी रुग्णालयात या आजाराचे रुग्ण उपचार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कुंभोजसह दुर्गेवाडी यासारख्या भागात या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. काहींवर बाहेरगावी खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांत तीन महिलांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, येथील प्राथमिक आरोग्य पथकामार्फत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था अथवा भीती निर्माण होऊ नये, या उद्देशाने दोन दिवसांपासून जेथे रुग्णांची संभाव्यता वाटते, अशा ठिकाणी आशासेविका, आरोग्यसेविका यांच्या सहकार्याने जवळपास २५६ घरांचा सर्व्हे करून सुमारे दोन हजार रुग्णांची तपासणी केली आहे. दोन लहान मुलांमध्ये अल्प प्रमाणात आजाराचे लक्षणे दिसून आल्याने एका मुलावर येथील प्राथमिक आरोग्य पथकात उपचार केले. अन्य एकाला सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
गॅस्ट्रो वैगरे काही नसून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसे काही वाटल्यास आरोग्य पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेयस चौगुले यांनी केले आहे.
-----------
गेल्या दोन-चार दिवसांत तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. यातील एकाही महिलेचा मृत्यू गॅस्ट्रोने झाला नाही. तिन्ही मृत्यूची कारणे वेगळी आहेत.
-डॉ. श्रेयस चौगुले, वैद्यकीय अधिकारी, कुंभोज