
कुंभोज करबल स्पर्धेत चाँदपीर रेंदाळ व मातृभूमी बागणी विभागून प्रथम
रेंदाळचे ‘चाँदपीर’, बागणीचे ‘मातृभूमी’ प्रथम
कुंभोजमध्ये करबल दंगल; कवठेपिरानचे ‘सातसय्यद’ द्वितीय
कुंभोज, ता. १२ ः येथील अकबर मोहल्ला व राजहंस तरुण मंडळातर्फे वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या करबल दंगल स्पर्धेचे रेंदाळ येथील चाँदपीर करबल मेल व बागणी येथील मातृभूमी करबल मेलने विभागून प्रथम क्रमांक पटकावला.
दोन्ही संघांना सात फुटी ढाल व ११ हजार रुपये देऊन गौरवले. स्पर्धेचे उद्घाटन वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, किरण सूर्यवंशी, चाँद मुजावर यांनी केले. अन्य निकाल असा ः द्वितीय क्रमांक सातसय्यद करबल मेल कवठेपिरान, तृतीय क्रमांक गुरू बाबाजी करबल मेल हेरले, चतुर्थ क्रमांक पंजतन करबल मेल दानोळी, पाचवा क्रमांक सरमस्त करबल मेल आळते, सहावा क्रमांक गैबी साहेब करबल मेल दानोळी, सातवा क्रमांक पंजतन करबल मेल नेज यांनी पटकावला. सर्व करबल मेल यांना बक्षिस व ढाल देऊन गौरवले. पंच म्हणून शक्रुद्दीन मुल्ला, मुबारक मुल्ला, रमजान तांबोळी यांनी काम पाहिले. उपसरपंच अनिकेत चौगुले, संभाजी मिसाळ, विनायक पोतदार, आप्पासो पाटील, राहुल कत्ते, आदित्य पाटील, रावसो पाटील, राजन डोणे आदी उपस्थित होते. रईस मुजावर यांनी स्वागत केले. जुबेर तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. मुबारक मुल्ला यांनी आभार मानले.