Fri, Feb 3, 2023

समंतभद्र महाराज यांची आज जयंती
समंतभद्र महाराज यांची आज जयंती
Published on : 18 December 2022, 3:31 am
समंतभद्र महाराज
यांची आज जयंती
कुंभोज ः बाहुबली येथील बाहुबली विद्यापीठातर्फे गुरूदेव समंतभद्र महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवारी(ता. १९) सकाळी साडेसात वाजता प्रतिमा मिरवणूक, आठ वाजता चरणाभिषेक, साडेआठ वाजता गुरूदेवश्री समंतभद्र पूजन, नऊ वाजता इष्टोपदेश पठण तर साडेनऊ वाजता विनयांजली सभा होणार आहे. अध्यक्षस्थानी बाहुबली ब्रह्मचर्याश्रमचे उपाध्यक्ष धनराज बाकलीवाल तर प्रमुख अतिथी अजितकुमार पाटील, कोल्हापूर आहेत. समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.