Sun, Feb 5, 2023

जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध
जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध
Published on : 25 December 2022, 12:56 pm
जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध
कुंभोज ः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन कालावधीसाठी निलंबित केले. याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केले. येथे या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. सुडबुध्दीने निलंबित करण्यात आले, असा आरोप करीत येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत आंदोलन केले. काँग्रेसचे किरण माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदेश भोसले, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे निवास माने यांनी मनोगत व्यक्त केले. सदानंद महापूरे, कौस्तुभ माळी, दीपक कोळी, शहानवाज मुजावर, दिलीप मिसाळ, प्रकाश तोरस्कर, सुरेश भगत, ऋतुराज तोरस्कर, सतीश कोळी, पिंटू माळी उपस्थित होते.