
शांतीसागर साधकाश्रमास भेट
04162
बाहुबली : शांतीसागर साधकाश्रमामधील वृद्धांना फळे व इतर साहित्य शिक्षक व विद्यार्थ्यांनी दिली.
-----------
शांतीसागर साधकाश्रमास भेट
कुंभोज ः बाहुबली येथील एम. जी. शहा विद्यामंदिरच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शांतीसागर साधकाश्रम या वृद्धाश्रमास भेट दिली. संचालक तथा मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांच्या कल्पनेतून सहा वर्षे पाचवीचे विद्यार्थी बाहुबली येथील शांतीसागर साधकाश्रम या वृद्धाश्रमास भेट देतात. अध्यापक व विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमाच्या संस्थापिका कांचन कापसे यांच्या कार्याविषयी व आजी आजोबा यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक नेमीनाथ बाळीकाई, व्यवसाय प्रमुख अरुण चौगुले आदी उपस्थित होते. अश्विनी पाटील यांनी स्वागत केले. अध्यापिका शिलप्रभा कोले यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमंधर वांजुळे यांनी आभार मानले.