अनेक कुटुंबे धान्यापासून वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनेक कुटुंबे धान्यापासून वंचित
अनेक कुटुंबे धान्यापासून वंचित

अनेक कुटुंबे धान्यापासून वंचित

sakal_logo
By

04164
संग्रहित छायाचित्र
----------------
अनेक कुटुंबे धान्यापासून वंचित
शिधापत्रिकेतील सदस्यांची नावे आधारकार्डशी संलग्न नसल्याचा परीणाम
राजू मुजावर : सकाळ वृत्तसेवा
कुंभोज, ता. २८ ः शिधापत्रिकेतील कुंटुंबातील सदस्यांची नावे आधारकार्डशी संलग्न नसल्याने शेकडो कुंटुबे धान्यापासून वंचित आहेत. शिधावाटप दुकानांमध्ये धान्य असले तरी ते ग्राहकांना देता येत नसल्याने दुकानदारही हतबल झाले आहेत.
शासनाने धान्य दुकानात ऑनलाईन वितरण व्यवस्था कार्यान्वित केली आहे. रेशनिंग दुकानात ई-पॉस मशीनद्वारे नागरिकांना गहू-तांदूळ वाटप करण्यात येते. शिधापत्रिकेतील कुंटुबातील प्रत्येक सदस्यांची नावे आधारकार्डशी संलग्न असणे गरजेचे आहे. अनेक कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड शिधापत्रिकेशी संलग्न झाले नसल्याने त्यांना शिधावाटप दुकानातील हक्काचे धान्य मिळेनासे झाले आहे.
--------
शिधावाटप पत्रिकेतील कुंटुबातील सदस्यांची नावे आधार कार्डशी संलग्न करावयाच्या सक्तीमुळे गोरगरीबांची कोंडी झाली आहे.
-भारती पोतदार, ग्रामपंचायत सदस्या, कुंभोज
-------------
धान्य दुकानातून कोणाचेही धान्या बंद करण्यात आलेले नाही. शिधावाटप पत्रिकेतील कुंटुबांतील सदस्यांची नावे आधारकार्डशी संलग्न करताच धान्य देण्यात येणार आहे. ज्यांची नावे आधारकार्डशी संलग्न नाहीत व ज्यांना धान्य मिळत नाही, अशांनी रेशनकार्ड व आधारकार्ड घेवून पुरवठा विभाग, हातकणंगले येथे संपर्क साधावा.
-संजय पुजारी, पुरवठा अधिकारी, हातकणंगले