
आदर्श प्रशालेत मराठी व विज्ञान दिन साजरा
04172
कुंभोज : आदर्श प्रशालेत मराठी राजभाषा व विज्ञान दिनानिमित्त प्रतिमापूजनप्रसंगी मान्यवर.
आदर्श प्रशालेत विविध उपक्रम
कुंभोज : नेज येथील साध्वी उदयप्रभाश्री आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या प्रशालेत मराठी राजभाषा व विज्ञान दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला. मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी पोवाडे, कविता, वक्तृत्व, नृत्य सादर केले. सर्व विद्यार्थी महाराष्ट्रीयन वेशभूषेत आले होते. विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, भाजी मंडई आणि विविध कलाप्रदर्शन झाले. मुलांना खरेदी-विक्री हा आशय लक्षात यावा, या हेतूने हा भाजी मंडई भरवण्यात आली होती. या मंडईचे आणि विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पालक प्रतिनिधी गिरीष कुलकर्णी, भरतकुमार पाटील, संतोष तिवडे यांनी केले. मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळे, फास्ट फूड, बेकरी उत्पादने विक्रीसाठी ठेवले होते. खरेदीसाठी बहुसंख्य पालक उपस्थित होते.