
ग्रामसचिवालयाच्या दुसऱ्या मजल्याचे काम सुरू
04192
कुंभोज : आमदार राजूबाबा आवळे यांचा सत्कार अरुणादेवी पाटील यांनी केला. यावेळी किरण माळी, अनिकेत चौगुले, दाविद घाटगे, जयश्री जाधव आदी उपस्थित होते.
-----------
ग्राम सचिवालयाच्या दुसऱ्या मजल्याचे काम सुरू
कुंभोज ः येथील ग्राम सचिवालयाच्या दुसऱ्या मजल्याच्या कामाचा प्रारंभ आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते झाला. गटनेते किरण माळी अध्यक्षस्थानी होते. येथील ग्राम सचिवालयाचे काम निधीअभावी अनेक महिने बंद होते. निधीसाठी येथील ग्रामपंचायतीतर्फे आवळे यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. त्यांनी या कामी सुमारे २५ लाखांचा निधी मंजूर केला. श्री. आवळे यांचा सत्कार सरपंच अरुणादेवी पाटील, उपसरपंच अनिकेत चौगुले यांनी केला. माधुरी घोदे, दाविद घाटगे, जयश्री जाधव, सदानंद महापुरे आदी उपस्थित होते. प्रकाश पाटील यांनी स्वागत केले. ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवे यांनी आभार मानले.