पालकमंत्री केसरकर यांची बाहुबलीस भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री केसरकर यांची बाहुबलीस भेट
पालकमंत्री केसरकर यांची बाहुबलीस भेट

पालकमंत्री केसरकर यांची बाहुबलीस भेट

sakal_logo
By

04296
बाहुबली : येथील भगवान बाहुबली मुर्तीचे दश॔न घेताना पालकमंत्री दीपक केसरकर. शेजारी धैय॔शील माने, प्रकाश आवाडे, बाबासाहेब पाटील, डी. सी. पाटील, अशोकराव माने, गोमटेश बेडगे
---------------
पालकमंत्री केसरकर यांची बाहुबलीस भेट
कुंभोज, ता. ७ ः पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बाहुबली येथे सदिच्छा भेट दिली. भगवान बाहुबली बृहन्मुर्ती दर्शन घेतले. संस्‍थेचे अध्‍यक्ष आमदार प्रकाश आवाडे त्यांच्या प्रयत्नातून मंत्री श्री. केसरकर यांनी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत बाहुबली येथे सुशोभीकरण व भक्तनिवास बांधणीसाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल आवाडे यांनी त्यांचा सत्कार केला.
खासदार धैर्यशील माने यांचा सत्‍कार संस्थेचे महामंत्री डी. सी. पाटील यांनी केला. कुंभोज ग्रामपंचायतीतर्फे सरपंच जयश्री जाधव, उपसरपंच अनिकेत चौगुले यांनी मंत्री केसरकर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हा परिषद माजी सदस्य डॉ. राहुल आवाडे, दलितमित्र अशोकराव माने, संचालक गोमटेश बेडगे, कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, बालविकासचे चेअरमन तात्यासाहेब अथणे, जवाहरचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, सरपंच जयश्री जाधव, उपसरपंच अनिकेत चौगुले आदी उपस्थित होते.
-----------
आराधना महमहोत्सवास भेट
नेज येथील सिध्‍दचक्र आराधना महामहोत्‍सवास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सदिच्‍छा भेट दिली. आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांचा सत्‍कार केला. अध्‍यक्ष धनचंद्र खिचडे, माजी सरपंच रविंद्र खोत, हिंगणगावचे सरपंच दीपक पाटील, शुभम खोत, राहुल पाटील आदी उपस्थित होते.