नेजमध्ये आराधना महोत्सवाची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेजमध्ये आराधना महोत्सवाची सांगता
नेजमध्ये आराधना महोत्सवाची सांगता

नेजमध्ये आराधना महोत्सवाची सांगता

sakal_logo
By

04332
नेज : येथील सिद्धचक्र आराधना महोत्‍सवाप्रसंगी काढण्‍यात आलेला रथोत्‍सव.
-------------
नेजमध्ये आराधना महोत्सवाची सांगता
कुंभोज, ता. १२ ः नेज येथील सिद्धचक्र आराधना महोत्सवाची सांगता विविध धामि॔क सांस्‍कृतिक कार्यक्रमांबरोबरच रथोत्सवाने केली. सकाळी सौधम॔ इंद्र-इंद्राणी शितल खिचडे व सुरेखा खिचडे यांचे मिरवणुकीने सभामंडपात आगमन झाले. मंगलकुंभ मानकरी सुदर्शन पाटील यांच्याहस्ते जलकुंभ मंडपात आणले. सकाळी सिद्धचक्र विधान बीजाक्षर, पंचामृत अभिषेक, शांतिधारा, यंत्राभिषेक आदी विधी झाले. १०८ धम॔सागर महाराज, १०८ विद्यासागर महाराज, १०८ सिध्‍दांतसागर महाराज यांचे आशीवच॔न झाले. यानंतर मुनीजनांची संघपुजा, धनपती कुबेरद्वारा रत्‍नवृष्‍टी, मूलनायक, शिखरस्‍थ व्‍माधस्‍तंभपरी भंगवंतांचा १०८ कलशांनी महाभिषेक केला. सायंकाळी रथोत्‍सवास प्रारंभ केला. रथोत्सवाचे मानकरी सौ. व श्री. रविराज पाटील, हत्तीचे मानकरी सौ. व श्री. आप्पासो पाटील हे विराजमान झाल्यानंतर रथोत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवपुरी व नेज गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक जैन मंदिरात आली. केरळ येथील बॅण्‍ड वाद्य आकर्षक लाईटशो डॉल्बी आदी वाद्यांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान करून पंचरंगी ध्वज हातामध्ये घेऊन श्रावक श्राविका सहभागी झाले होते. समस्त मुस्लिम समाजातर्फे श्रावक-श्राविकांना आईस्क्रीम वाटप केले.