नरंदेमध्ये विकासकामांचे उद्‍घाटन

नरंदेमध्ये विकासकामांचे उद्‍घाटन

04380
नरंदे : अरुण इंगवले यांचा सत्‍कार अभिजित भंडारी यांनी केला. यावेळी अजिंक्‍य इंगवले, रेखा पाटील, रवींद्र अनुसे, सुनील भोसले, एल. एस. मिसाळ उपस्थित होते.
-------------
नरंदेमध्ये विकासकामांचे उद्‍घाटन
कुंभोज, ता. ३० ः पाच वर्षांत नरंदे गावचे आराध्‍य दैवत नागनाथ मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून परिसरात दोन कोटींच्‍या विकासकामांबरोबरच गावच्‍या पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे साडेचार कोटींचा भरीव निधी दिला, असे जिल्‍हा परिषदेचे माजी सदस्‍य अरुण इंगवले यांनी सांगितले.
नरंदे येथे अरुण इंगवले यांच्‍या फंडातून व विशेष प्रयत्‍नातून मंजूर झालेल्‍या व लोकनेते कै. सीताराम आबाजी भंडारी (बापूजी) पॕनेलच्‍या पुढाकाराने व पाठपुराव्‍याने मंजूर ६३ लाखांच्‍या विविध विकासकामांच्‍या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. पॅनेलप्रमुख, शरदचे संचालक अभिजित भंडारी अध्‍यक्षस्‍थानी होते. आळतेचे लोकनियुक्‍त सरपंच अजिंक्‍य इंगवले, अभिजित भंडारी, माजी सरपंच रवींद्र अनुसे, अनिल भोसले, शांतिनाथ देसाई यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. अरुण इंगवले, अजिंक्‍य इंगवले, शाखा अभियंता एल. एस. मिसाळ, सुनीता गिड्डे, कविता कुरणे, आळतेचे माजी उपसरपंच फैयाज मुजावर, संतोष कांबळे, स्‍नेहा पाटील यांचा सत्‍कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच रेखा पाटील, संदीप भंडारी, विनोद भंडारी, रूपाली अनुसे, कविता भंडारी, सिकंदर मुल्‍लाणी आदी उपस्थित होते. नितीन कदम यांनी स्‍वागत केले. राहत मुल्‍ला यांनी सूत्रसंचालन केले. मयुर देसाई यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com