विकासाभिन्‍मुख नेतृत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासाभिन्‍मुख नेतृत्व
विकासाभिन्‍मुख नेतृत्व

विकासाभिन्‍मुख नेतृत्व

sakal_logo
By

04389
-----------
डोके ः किरण माळी वाढदिवस विशेष
-----------
विकासाभिन्‍मुख नेतृत्व
कर्मावीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्‍थेचे संचालक तसेच विकासाभिन्‍मुख नेतृत्व किरण आण्‍णा माळी यांचा शुक्रवारी (ता.२) ५१ वा वाढदिवस यानिमित्त...
--------
कुंभोज येथील सव॔सामान्‍य कुटुंबात किरण माळी यांचा जन्‍म २ जून १९७२ रोजी झाला. कुंभोज विकास सेवा संस्‍थेचे अध्‍यक्ष श्रीकांत माळी, शरदचे माजी संचालक बी. एम. माळी या दोन्‍ही मामांकडून त्‍यांना जन्‍मापासूनच राजकारणाचा वसा व वारसा मिळाला. १९९८ मध्‍ये कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवती॔ सहकारी बँकेतून नोकरीचा प्रारंभ केला. यादरम्‍यान त्‍यांनी विक्रम क्रीडा मंडळाच्‍या माध्‍यमातून सामाजिक व स्‍वगी॔य आमदार बाबा कुपेकर, माजी खासदार कल्‍लाप्‍पाण्‍णा आवाडे यांचा आदर्श डोळ्‍यासमोर ठेवून राजकीय प्रवासास सुरवात केला. दहा वर्षे वाढदिवसानिमित्त ते रक्‍तदान शिबीराचे आयोजन करुन सामाजिक बांधीलकी जपत आहेत. गावातील श्रध्‍दास्‍थान हनुमान मंदीराच्‍या जिणो॔ध्‍दारासाठी युवकांना संघटीत करून जिर्णोद्धार समितीची स्‍थापना केली. मंदिराच्‍या जिर्णोद्धाराबरोबर माजी सरपंच प्रकाश पाटील यांच्‍या सहकार्याने तत्‍कालिन खासदार राजु शेट्टी यांच्‍या पाच लाख रुपये फंडातून हनुमान मंदीर सांस्‍कृतिक भवनाचे काम पूर्ण केले. २०१७ मध्‍ये आमदार सतेज पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार राजु आवळे यांनी कुंभोज जिल्‍हा परिषद मतदार संघातून श्री. माळी यांना काँग्रेसची उमेदवारी दिली. यावेळी त्ं‍याचा अल्‍प मतांनी पराभव झाला. मात्र पराभवाने न खचता त्‍यांनी समाजकार्य अविरतपणे सुरु ठेवले. २०२० मध्‍ये कोरोनात कोवीड रुग्णांसाठी लोकवर्गणीतून व किरण माळी युवा मंचच्‍या माध्‍यमातून रयत गुरुकुलमध्‍ये कोवीड सेंटर सुरु केले. आमदार राजु आवळे यांच्‍या फंडातून गावात सुमारे तीन कोटीची विकासकामे केली. अनेक वषे॔ रखडलेला बुवाचे वाठार रस्‍ता यासह प्रलंबित पाणंद रस्‍त्‍यांचे काम मागी॔ लावले. आमदार सतेज पाटील, आमदार राजु आवळे यांच्‍या विशेष प्रयत्‍नातून सुसज्‍ज ग्रामसचिवालयाचा प्रश्‍न मागी॔ लावला. जवाहरचे उपाध्‍यक्ष बाबासाहेब चौगुले यांच्‍या सहकार्याने आमदार प्रकाश आवाडे यांच्‍या प्रयत्‍नातून बायपास रस्‍त्‍यासाठी १ कोटी १७ लाखांचा निधी मंजूर करून हा प्रश्‍न मागी॔ लावला. सामाजिक व राजकीय कार्याबरोबरच सहकारमध्‍ये त्‍यांनी योगदान दिले आहे. कर्मवीर ग्रामीण बिगर शेती पतसंस्‍था व श्रीराम शेतकरी पाणी पुरवठा या संस्‍थेत त्यांनी अनेक वर्षे संचालक म्‍हणून उल्‍लेखनीय कार्य केले आहे. नुकत्‍याच झालेल्‍या कुंभोज विकास सेवा संस्‍थेच्‍या निवडणुकीत किरण माळी यांच्‍या नेतृत्‍वाखालील पॅनेलने निर्विवाद वर्चस्‍व मिळवले. तीन वर्षापूवी झालेल्‍या ग्रामपंचायत निवडणुकीत किरण माळी यांच्‍या पॕनेलने सतरा पैकी बारा जागा जिंकून सत्ता काबीज केली. पत्‍नी शुभांगी माळी यांना विक्रमी मतांनी निवडून आणले. त्‍यांच्‍या यशस्‍वी वाटचालीत बंधू नंदकुमार माळी, सुहास माळी, अनिल माळी, वहिनी माजी पंचायत समिती सदस्‍या निर्मला माळी, माजी सरपंच माधवी माळी, पत्‍नी ग्रामपंचायत सदस्‍या शुभांगी माळी यांचे सहकार्य लाभत आहे. अशा या नेतृत्‍वाला वाढदिवसाच्‍या लाख लाख शुभेच्‍छा!

(पुरवणी संकलन-राजू मुजावर,कुंभोज)