फेटे बांधण्याच्या कौशल्यातून रोजगाराचे साधन

फेटे बांधण्याच्या कौशल्यातून रोजगाराचे साधन

04391
पन्‍हाळा : खासदार अमोल कोल्‍हे यांना एका कार्यक्रमात फेटा बांधताना अनिल सपकाळ.
-------------------------------
फेटे बांधण्याच्या कौशल्यातून रोजगाराचे साधन
कुंभोजमधील अनिल सपकाळ यांनी केली नवीन व्यवसायाची बांधणी
राजू मुजावर : सकाळ वृत्‍तसेवा
कुंभोज, ता.२ ः पूर्वी फेट्याला खूप महत्‍व होते. डोक्‍यावर फेटे असणाऱ्यांना मानाचे स्‍थान होते. पण, काळाच्‍या ओघात पेहराव बदलला तसे फेटे घालणारे दिसानासे झाले. पण, आजही लग्‍न, सत्‍कार सोहळा येथे फेटे घालून स्‍वागत करण्‍याची पध्‍दत काही जण जपत आहेत. पण, हे फेटे बांधणे सहजासहजी कोणाला शक्‍य नाही. ते कौशल्‍याचे काम आहे. याच कौशल्‍याला येथील एका तरूणाने रोजगाराचे साधन केले. अनिल सपकाळ असे त्‍याचे नाव आहे.
कुंभोजबरोबरच परिसरात फेटे बांधण्‍यासाठी त्‍याला आमंत्रण मिळत आहे. न्‍हावी काम हा अनिलच्‍या कुटुंबियाचा पारंपारिक व्‍यवसाय. पण वाढत्‍या माहागाईमुळे या व्‍यवसायावर घर चालवणे अनिलला अवघड झाले. या व्‍यवसायासोबतच दुसरा काही व्यवसाय करावा, याचा त्‍याने विचार केला. लग्‍न सोहळ्‍यात फेटे बांधून देणाऱ्यांना मोठा भाव असतो आणि फेटे कोणालाही बांधून देता येत नाहीत, हे त्‍याने हेरले. फेटे बांधून देण्‍याचा व्‍यवसाय करण्‍याचा निश्‍चय केला. त्‍यासाठी त्‍याने २०१५ मध्‍ये शिरोली येथील सुनिल जाधव यांच्‍याकडून प्रशिक्षण घेतले. लग्‍न समारंभ, वाढदिवसाचे कार्यक्रम, विविध जयंती काय॔क्रम, शासकिय कार्यक्रम आदी ठिकाणी त्‍याला फेटे बांधण्‍यासाठी बोलवले जाते. त्‍यातून त्‍याला बऱ्यापैकी मिळकत मिळत आहे.
------------
उत्पन्नाचे साधन नाही, रोजगार नाही, असे म्‍हणून चालणार नाही. लोकांची काय गरज आहे आणि कोणत्‍या क्षेत्रात पोकळी आहे. हे ओळखून तरुणांनी करिअर करावे. मी फेटे बांधण्‍याच्‍या क्षेत्रातील पोकळी हेरली. या पध्‍दतीने काम केल्‍यास कोणीही बेरोजगार राहणार नाही.
-अनिल सपकाळ, कुंभोज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com