वाझेचा जामीन अर्ज नामंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाझेचा जामीन अर्ज नामंजूर
वाझेचा जामीन अर्ज नामंजूर

वाझेचा जामीन अर्ज नामंजूर

sakal_logo
By

सचिन वाझेचा जामीन फेटाळला
मुंबई : खंडणीवसुलीच्या आरोपात अटकेत असलेला बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझेचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी नामंजूर केला. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वाझेविरोधात गुन्हा दाखल केला असून मनी लॉण्डरिंगचेही आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणात वाझे महत्त्वाचा दुवा असून तो जामिनावर सुटल्यास साक्षी-पुरावे प्रभावित करू शकतो, तसेच तो फरार होण्याची शक्यताही आहे, असा युक्तिवाद ईडीतर्फे करण्यात आला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणात संशयित असून त्यांना वाझेकडून महत्त्वाचे साह्य मिळत होते. त्यामुळे तो प्रभावशाली व्यक्ती आहे, असाही युक्तिवाद ईडीने केला. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे प्रमुख संशयित असून एनआयएने यामध्ये आरोपपत्र दाखल केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06353 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top