गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज
गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज

गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज

sakal_logo
By

चाकरमान्यांसाठी एसटी सज्ज
मुंबई : कोरोनाकाळात गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचा बेत हुकल्याने यंदा चाकरमान्यांनी गावी जाण्याची जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी एसटी महामंडळाकडूनही कोकणात जाण्यासाठी जादा बस सोडण्यात येणार असून मुंबई विभागातून तब्बल १,१२२ बस धावतील. २०१९ च्या तुलनेत यंदा जादा बसेसचे नियोजन मुंबई विभागाने केले आहे. या बससाठी २८ जूनपासून आरक्षण सुरू झाले असून १८ जुलैपासून ग्रुप बुकिंग सुरू करण्यात येत असल्याची माहिती मुंबई विभाग नियंत्रक मोनिका वानखडे यांनी दिली. महामंडळाने यंदा राज्यभरात २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २,५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १,३०० बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर ५ जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07412 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..