पवईमध्ये बिबट्याचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवईमध्ये बिबट्याचे दर्शन
पवईमध्ये बिबट्याचे दर्शन

पवईमध्ये बिबट्याचे दर्शन

sakal_logo
By

पवईमध्ये बिबट्याचे दर्शन
मुंबई : आरे बचावच्या निमित्ताने प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास वाचवण्याचा लढा सुरू असताना पवई पाईपलाईन परिसरात रविवारी सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. पवई पाईपलाईनजवळून जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्या फिरताना दिसला. दुतर्फा असलेल्या गर्द झाडांना लागूनच एका बाजूने मोठी जलवाहिनी जाते. जलवाहिनीखालून बिबट्या आल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिले. बिबट्याला बघून घाबरलेल्या चालकांनी वाहने जागेवरच थांबवली. वाहनांचा अंदाज घेत थांबलेला बिबट्या रस्त्यावर उतरला. रस्ता पार करत पलीकडे जायच्या प्रयत्नात तो होता; परंतु मध्येच माघारी फिरत तो पुन्हा जंगलात निघून गेला. एका वाहनचालकाने बिबट्याचा काढलेला व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08274 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..