छबिलदास सभागृहात सिलिंडरचा स्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छबिलदास सभागृहात 
सिलिंडरचा स्फोट
छबिलदास सभागृहात सिलिंडरचा स्फोट

छबिलदास सभागृहात सिलिंडरचा स्फोट

sakal_logo
By

छबिलदास शाळेत सिलिंडरचा स्फोट
मुंबई : दादर येथील प्रसिद्ध छबिलदास शाळेच्या सभागृहामध्ये बुधवारी (ता. २) पहाटे एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली. यात तीनजण गंभीर जखमी झाले. जखमी भरत सिंग (२६), जावेद अली (३८), गोपाल साहू (५०) यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिलिंडर स्फोटाच्या आवाजाने आसपासच्या नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली. स्फोटामुळे सभागृहातून उडालेल्या वस्तू खाली उभ्या असलेल्या वाहनांवर आदळल्याने त्यांचेही नुकसान झाले. आसपासच्या नागरिकांनी तातडीने सभागृहातील तसेच आजूबाजूला असलेल्यांना इमारतीच्या खाली उतरवले. अग्निशमन दलाने अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले.