मुश्रीफ यांचा अटकपूर्व
जामीन अर्ज फेटाळला

मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुश्रीफांच्या अडचणींत भर
---
अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाकडून नामंजूर
मुंबई, ता. ११ : मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज विशेष न्यायालयाने नामंजूर केला. यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) त्यांच्या दोन कारखान्यांमधील आर्थिक व्यवहारांबाबत तपास सुरू केला आहे. यापूर्वीही ‘ईडी’ने मुश्रीफ यांचा कारखाना आणि मालमत्तेवर छापे टाकले. त्यांची मुले नावेद, आबिद आणि साजिद पदाधिकारी असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या मालमत्तेबाबतही ‘ईडी’ने संशय व्यक्त केला आहे. आर्थिक उत्पन्न नसताना मोठ्या रकमेची देवाण-घेवाण झाल्याचा दावा ‘ईडी’ने केला आहे.
केवळ राजकीय हेतूने माझी चौकशी आणि आरोप सुरू केले आहेत, असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयातही त्यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. त्या वेळी उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला होता.

शुक्रवारपर्यंत दिलासा
विशेष न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी आज मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला, तरीही याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी दोन आठवडे संरक्षण देण्याची मागणी मुश्रीफ यांच्या वतीने करण्यात आली. मात्र, न्यायमूर्ती देशपांडे यांनी मुश्रीफ यांना आणखी तीन दिवस अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यानुसार न्यायालयाने मुश्रीफ यांना १४ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश ‘ईडी’ला दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com