महागावमध्ये एक दिवशीय चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागावमध्ये एक दिवशीय चर्चासत्र
महागावमध्ये एक दिवशीय चर्चासत्र

महागावमध्ये एक दिवशीय चर्चासत्र

sakal_logo
By

महागावमध्ये एकदिवसीय चर्चासत्र
महागाव, ता. ३ : देशाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांचे परिमार्जन संविधानाद्वारे होऊ शकते तसेच देश भविष्यात देखील एकसंध ठेवण्यासाठीचे संपूर्ण श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते, असे मत हिंगोली येथील बहिर्जी स्मारक कॉलेजचे प्रा. डॉ. नागराज मगरे यांनी व्यक्त केले. ते राजा शिवछत्रपती महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व अंतर्गत गुणवत्ता हमी विभागातर्फे आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनारमध्ये ‘राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. निवास जाधव होते.
दुसऱ्या सत्रात देवचंद कॉलेज निपाणी येथील डॉ. सुजाता पाटील यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विविध चळवळीत योगदान’ या विषयावर विचार मांडले. या चर्चासत्राचे उद्‍घाटन सेनापती प्रतापराव गुजर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांनी केले. प्रा. दिलीप काळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. संदीप इंगळे, प्रा. डी. जी. कापुरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. डॉ. वैजनाथ सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सागर सावंत व डॉ. केशव देशमुख यांनी आभार मानले.
वेबिनारसाठी मुख्य लिपिक बी. ए. पाटील, संचालक एन. डी. कांबळे, दिगंबर देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Mgn22b00682 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top