राजर्षी शाहू महाराज अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजर्षी शाहू महाराज अभिवादन
राजर्षी शाहू महाराज अभिवादन

राजर्षी शाहू महाराज अभिवादन

sakal_logo
By

महागाव परिसरात
सामुदायिक अभिवादन
महागाव, ता. ६ : छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञतापर्वानिमित्त महागाव व परिसरातील गावामध्ये १०० सेकंद स्तब्धता पाळून अभिवादन करण्यात आले. संत गजानन शिक्षण समुह, संत गजानन रूरल हॉस्पिटलमध्येही अभिवादन करण्यात आले. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नितेश रायकर यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य डाॕ. एस.एच.सावंत, प्राचार्य डॉ.एस.जी.किल्लेदार,प्राचार्य सुधिन्द्र जवळी,डॉ.महेश पाटील.प्रा.डी.बी.केस्ती यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
संत गजानन हॉस्पिटलमध्ये संस्थाध्यक्ष अॕड.आण्णासाहेब चव्हाण,डॉ संजय चव्हाण,डॉ यशवंत चव्हाण डॉ.सुरेखा चव्हाण डॉ प्रतिभा चव्हाण यांच्यासह अन्य डॉक्टर,कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रतिमेचे पूजन प्राचार्य आय.एस.पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील ,पर्यवेक्षक अशोक नांदुलकर यांची प्रमुख उपस्थिती होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. सुप्रिया खन्ना यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ग्रामपंचायतीमध्ये प्रतिमेचे पूजन सरपंच ज्योत्स्ना पताडे यांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायत सदस्य फिरोज सोलापुरे यांच्यासह अन्य सदस्य, कर्मचारी,आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होते. हरळी खु ग्रामपंचायत व हिरण्यकेशी विद्यालय येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी सरपंच उर्मिला पाटील, मुख्याध्यापक शशिकांत नलवडे, उपसरपंच रामदास कुंभार, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. महागावातील सर्व व्यापारी,पतसंस्था,बँका कर्मचारी, व्यावसायिकांनी अभिवादन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mgn22b00685 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top