आरटीई अंतर्गत जिल्ह्यात पहिल्या फेरीत १६९६ प्रवेश निश्‍चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीई अंतर्गत जिल्ह्यात पहिल्या फेरीत १६९६ प्रवेश निश्‍चित
आरटीई अंतर्गत जिल्ह्यात पहिल्या फेरीत १६९६ प्रवेश निश्‍चित

आरटीई अंतर्गत जिल्ह्यात पहिल्या फेरीत १६९६ प्रवेश निश्‍चित

sakal_logo
By

जिल्ह्यात पहिल्या फेरीत
१६९६ प्रवेश निश्‍चित
आरटीई प्रक्रिया; प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मिळणार संधी
गणेश बुरुड : सकाळ वृत्तसेवा
महागाव, ता. १८ : मोफत शिक्षणासाठी (आरटीई) प्रवेश प्रक्रिया संपली आहे. या मुदतीअखेर जिल्ह्यात १६९६ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्‍चित केला आहे. पहिल्या फेरीसाठी दोन वेळा मुदत वाढ देऊन ही प्रवेशाकडे अनेक कारणांनी पाठ फिरवली आहे. यानंतर आता या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात येणार नाही, तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागेवर प्रवेशाची संधी देण्यात येणार आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत प्रतीक्षा यादीबाबत घोषणा करण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील पाल्यासाठी खासगी शाळांत २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. यावर्षी राबविलेली केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
जिल्ह्यात २०२२-२३ साठी मोफत शिक्षण प्रवेश प्रक्रियेसाठी ३४१ शाळांनी नोंदणी केली होती. या शाळांमधून ३३१४ जागा प्रवेशासाठी निश्चित करण्यात आल्या होत्या. या जागेसाठी जिल्ह्यातून ३४४९ अर्ज आले होते. यातून पहिल्या फेरीसाठी २४०७ जणांना मोफत शिक्षणासाठी लॉटरी लागली. ८५७ जणांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती. उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. ही प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mgn22b00692 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top