
‘संत गजानन’ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे ‘जीपॅट’मध्ये यश
00926
महागाव : येथील फार्मसी महाविद्यालयातील जीपॅट परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य डॉ. एस. जी. किल्लेदार, प्रा. सुनील गळतगे व मार्गदर्शक शिक्षक.
‘संत गजानन’ फार्मसीच्या
विद्यार्थ्यांचे ‘जीपॅट’मध्ये यश
महागाव, ता. २६ : येथील संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी ‘जीपॅट’ परीक्षेत यश मिळविले. राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट (जीपॅट) परीक्षेत उच्च शिक्षणासाठी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत महाविद्यालयाचा प्रवीण घेजी याने राष्ट्रीय स्तरावर ७३१ वा क्रमांक मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला. त्याबरोबरच महादेवी मोलादी (१४४९), साक्षी गुरव (२६१३), रोहिणी कोडोली (३२३८), प्रवीण गुरव (३५००), स्नेहल शेटके (११७२१) यांनीही यश मिळविले.
महाविद्यालयाच्या सुरूवातीपासूनच या परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. ऑनलाईन वर्ग घेणे, परीक्षेसाठी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन व ऑनलाईन सराव परीक्षा घेणे या सर्वांचे फलित म्हणून महाविद्यालयाची यशाची ही परंपरा कायम राहिली असल्याचे प्राचार्य डॉ. एस. जी. किल्लेदार यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष अॕड. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. या परीक्षेच्या तयारीसाठी प्राचार्य डॉ. एस. जी. किल्लेदार, समन्वयक प्रा. सुनील गळतगे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mgn22b00698 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..