
साप आल्यास मारू नका, सर्पमित्रांशी संपर्क साधा
साप आल्यास मारू नका,
सर्पमित्रांशी संपर्क साधा
महागाव परिसरात आवाहन
महागाव, ता. २६ : सध्या जागोजागी साप बाहेर निघत आहेत. अशा वेळी सापाला न मारता आणि घाबरून न जाता परिसरातील सर्पमित्राला संपर्क साधा, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
पावसाळा आला असल्याने सापाला राहण्याकरिता जागा मिळत नाही. पर्यायाने ते घरात, गोठ्यात अन्य कोरड्या जागी येतात. साप दिसल्यास घरातील लोक घाबरून जातात. सापाला मारतात. अशा घटना अनेक ठिकाणी घडतात.
पावसाळ्यात सापाच्या बिळात पाणी गेल्याने ते कोरड्या जागेच्या शोधात बाहेर पडतात. साप हा मानवासाठी धोकादायक असल्याच्या भावनेतून त्याला मारण्याचे प्रमाण वाढत आहे. हे थांबविण्यासाठी महागाव परिसरातील सर्पमित्रांनी आवाहन केले आहे.
---------------
चौकट
अशी घ्या काळजी...
- अडचणीच्या ठिकाणी काम करताना पायात बूट असावे
- रात्रीच्या वेळी बॅटरी व काठी सोबत असावी
- पावसाळ्यात शक्यतो जमिनीवर झोपू नये
- रात्रीच्या वेळी जेवणाची भांडी स्वच्छ असावीत
- घरातील सांडपाणी बाहेर जाणाऱ्या आऊटलेटला पक्की जाळी बसवा
- घरात उंदीर, घूस याचा वावर होणार नाही, याची काळजी घ्या
---------------
कोट
साप पावसाळ्यात बाहेर येत असतात. जर तुमच्या घरात, शेतात किंवा आजूबाजूला साप दिसला, तर घाबरून जाऊ नका. त्वरित आम्हाला संपर्क करा. आतापर्यंत आम्ही ३५ सापांना पकडून सुरक्षित स्थळी सोडले आहे.
- संतोष कुंभार, सर्पमित्र, महागाव
Web Title: Todays Latest Marathi News Mgn22b00741 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..