महागाव परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागाव परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात
महागाव परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात

महागाव परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात

sakal_logo
By

महागाव, हरळी परिसर
महागाव : परिसरातील हरळी खुर्द, उंबरवाडी व हुनगिनहाळ येथील शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, दूध संस्था, विकास सोसायटी आणि तरूण मंडळांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये उदय सोमशेट्टी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य आय.एस. पाटील होते. या वेळी ॲड. हणमंतराव पाटील, प्रा. डी. एस. पाटील, अण्णासाहेब पाटील, श्रीशैल पाटील, फिरोज सोलापुरे, गुलाब मुगळे उपस्थित होते. महागाव ग्रामपंचायतमध्ये कॅप्टन महादेव घुगरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी सरपंच ज्योत्स्ना, ग्रामविकास अधिकारी संदीप धनवडे, उपसरपंच निवृत्ती मांडेकर, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
नेहरू चौकात अॅड. हणमंतराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. श्रीशैल पाटील, नाना कोकितकर, प्राचार्य इंद्रजीत पाटील, भीमराव चिगरे उपस्थित होते. कन्या व कुमार विद्या मंदिरमध्ये समितीचे अध्यक्ष असिफ खलिफ यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. रेश्मा पोटे, आफ्रोज पठाण, अनिल घेवडे, नजीर बागवान ,भागेश घुगरे, मिलिंद शिंदे उपस्थित होते. शिवाजी विद्यालयात माजी सैनिक सयाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. अध्यक्षस्थानी एस. बी. पोवार होते. या वेळी प्रकाश पताडे, तुकाराम सुरंगे, मल्हारी कुलकर्णी, नानासाहेब पताडे, मुख्याध्यापक ना. शि. घोलप उपस्थित होते. राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात गेग्ररी थॉमस कोरदेरो यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. निवास जाधव होते. या वेळी विठ्ठलराव करवळ, पांडुरंग चौगुले, सचिन सावंत, अशोक कोकितकर, विठ्ठलराव कांबळे, आप्पासाहेब सुरंगे, शंकर शिंदे उपस्थित होते.
महागाव विकास सेवा सोसायटीत श्रीशैल पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी चेअरमन व सर्व संचालक उपस्थित होते.
शिवाजी चौकात राम वळतकर यांचे हस्ते ध्वजवंदन झाले. हिरण्यकेशी विद्यालय हरळी खुर्द येथे शंभू सिंह देसाई महागावकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. ग्रामपंचायत हरळी खु. येथे सरपंच उर्मिला पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उपसरपंच रामदास कुंभार, सिताराम पाटील, बालकृष्ण परिट, निकेत नाईक, ग्रामसेवक टी. वाय. हनुमंते उपस्थित होते.
विकास सोसायटीत निवृत्त कर्नल विलासराव सुळकुडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी चेअरमन शशिकांत चौगुले, अजित पाटील, संचालक उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा हरळी खु येथे माजी सैनिक भैरु बुरुड यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मुख्याध्यापक भैरु बामणे, रेखा पाटील, शशि कांत चौगुले उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. प्रसन्ना चौगुले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. तलाठी कार्यालय महागाव येथे मंडल अधिकारी रजनी चंदनशिव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. युवराज सरनोबत उपस्थित होते.
संत गजानन शिक्षण समुहात संस्थापक ॲड.आण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात झाले. प्रधान कार्यालयाचे ध्वजवंदन सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण याच्या हस्ते झाले. आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांनी रॕली व पथनाट्य सादर केले. या वेळी डॉ यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, प्रा. अजिंक्य चव्हाण, डॉ. मंगल मोरबाळे, डॉ. एस. जी. किल्लेदार, डॉ. एस. एच. सावंत, डॉ. अन्सार पटेल, प्रा. डी. बी. केस्ती, रजिस्टार शिरीष गणाचार्य उपस्थित होते.
मलिग्रे (ता आजरा) हायस्कूलमध्ये विस्तार अधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. आण्णासाहेब पाटील, मुख्याध्यापक सुभाष पाटील, समीर पारदे, सरपंच शारदा गुरव, उपसरपंच राजाराम नावलगी उपस्थित होते. महात्मा फुले प्राथमिक शाळेत शोभा जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी मनिषा सुतार, शिवाजी भगुत्रे उपस्थित होते. ग्रामपंचायतमध्ये सरपंच शारदा गुरव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी समीर पारदे, ग्रामसेवक,सदस्य उपस्थित होते. हरळी.बु. ग्रामपंचायतमध्ये सरपंच निलम कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. अमर कांबळे, सदस्य उपस्थित होते. सिंबायोसिस हायस्कूलमध्ये जवान नामदेव यमेटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. मुख्याध्यापक संभाजी कार्वेकर, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामपंचायत हुनगिनहाळमध्ये सरपंच दयानंद गुंडली यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. उपसरपंच दयानंद कांबळे, ग्रामस्थ उपस्थित होते. वैरागवाडी ग्रामपंचायतमध्ये अनिता सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी सरपंच लता सुतार, उपसरपंच इंद्रायणी पाटील, पी. के. पाटील उपस्थित होते. ग्रामपंचायत मासेवाडीमध्ये सरपंच रोहिणी विजय रेडेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. विद्या मंदिर मासेवाडीमध्ये जोतिबा रामचंद्र टक्केकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले..

Web Title: Todays Latest Marathi News Mgn22b00759 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..