‘संत गजानन’मध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

‘संत गजानन’मध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

‘संत गजानन’मध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
कॅन्सरग्रस्त गुडघा प्रत्यारोपण : गडहिंग्लज विभागात प्रथमच यशस्वी उपचार
महागाव, ता. २३: येथील संत गजानन रुरल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. कर्नाटकातील शिप्पूर येथील एका अंध रुग्णाच्या डाव्या बाजूच्या गुडघ्यावर सहा तासाच्या अथक प्रयत्नातून येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.
ज्योतीराम तिबिले (वय ५५) जन्मताच अंध असलेल्या रुग्णाला दोन वर्षापासून हा त्रास जाणवत होता. त्यामुळे चालणे त्रासदायक होत होते. येथील हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या तपासणीनंतर गुडघ्याला कॅन्सरची गाठ असल्याचे समजले. निदानानंतर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. बडोदा गुजरात येथे संपर्क साधून दोन लाख किमतीचा कृत्रिम अवयव मागवला. डॉ. अनिल पाटील व इतर टीमने सहा तासाच्या अथक प्रयत्नातून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, भूलतज्ज्ञ डॉ. सुरेखा चव्हाण या टीमसह कर्नाटक सुवर्ण आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रशांत होटगीमठ यांचे सहकार्य मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com