
मुंगुरवाडी मानसिक रुग्ण समुपदेशन
01307
मानसिक आरोग्याबाबत जनजागृती गरजेची
डॉ. अपर्णा कुलकर्णी; मुंगूरवाडीत मानसिक रुग्णांना समुपदेशन
महागाव, ता. २५ : समाजाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी सर्वाचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. त्यासाठी शारीरिक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्याची काळजी घेणे व मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते मुंगूरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत आयोजित समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या. प्रमुख उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या चारुशीला भास्कर व मानसोपचारतज्ज्ञ उदयसिंह माने होते.
मुंगुरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मनशक्ती कार्यशाळा झाली. त्या कार्यशाळेत मानसिक आजार असणाऱ्या रुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्यात आले. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशन व मार्गदर्शन डॉ.अपर्णा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. मिंलीद मिरजकर, एस. एस. निकम, बी. एस. माळी, एम. एम. दळवी, एस. एस. राणे, एस. पी. गारवे, पी. एन. बेनाडे, आर. बी. कांबळे, ए. बी. नौकुडकर, प्रियंका टीका उपस्थितीत होते. मधुकर पाटील यांनी आभार तर प्रास्ताविक एस. के. सुतार यांनी केले.