‘संत गजानन’ च्या ३५४ विद्यार्थ्यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘संत गजानन’ च्या ३५४ विद्यार्थ्यांची निवड
‘संत गजानन’ च्या ३५४ विद्यार्थ्यांची निवड

‘संत गजानन’ च्या ३५४ विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By

01315
महागाव : विविध कंपनीत निवड झालेल्या संत गजानन पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य डी. बी. केस्ती, प्रा. संतोष गुरव, प्रा. आर. एस. पाटील आदी उपस्थित होते.
----------
‘संत गजानन’ च्या ३५४ विद्यार्थ्यांची निवड
महागाव, ता. २७ : येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकमध्ये २०२३-२४ मध्ये चौदा कॅम्पस मुलाखती झाल्या. यातून ३५४ विद्यार्थ्यांची निवड केली. यामध्ये संत गजानन महाविद्यालयाचे १७८ तर इतर पॉलिटेक्निकमधून १७६ विद्यार्थ्यांची निवड झाली. विशेष म्हणजे संत गजानन पॉलीटेक्निकची वैष्णवी कुंभार या विद्यार्थिनीची मुंबईतील शिनाईडर इलेक्ट्रिक या बहुराष्ट्रीय कंपनीसाठी यावर्षीच्या सर्वाधिक ३.७५ लाख वार्षिक वेतनावर निवड झाल्याची माहिती प्राचार्य डी. बी. केस्ती यांनी दिली.
फेब्रुवारी व मार्चमधील कॅम्पस मुलाखतीतून जॉन डीअर इंडिया पुणे (१०६), टाटा मोटर्स पुणे (९२), मॕग्ना ऑटोमॅटिव्ह इंडिया पुणे (५५), कमिन्स इंडिया पुणे( ६९ ), के. एस. पी. जी. ऑटोमॅटिव्ह पुणे (१८), बजाज ऑटो (१३), शिनाईडर इलेक्ट्रिक मुंबई (१) तसेच एक्स फोर्स कंझूमर बेळगाव यांची नुकताच मुलाखती झाल्या आहेत.
द्वितीय सत्रातील लार्सन अँड टुब्रोची शुक्रवारी (ता. ३१) कॉलेजमध्ये कॅम्पस होणार आहे. विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वस्त डॉ. संजय चव्हाण यांनी केला आहे.