
‘एसजीएम टॅलेंट हंट’ स्पर्धेला प्रतिसाद
‘एसजीएम टॅलेंट हंट’ स्पर्धेला प्रतिसाद
महागाव, ता. ७ : संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत ‘एसजीएम टॅलेंट हंट’ स्पर्धा झाली. स्पर्धेमध्ये आजरा, गडहिंग्लज, चंदगड, इचलकरंजी, निपाणी व बेळगांव येथील बारावी विज्ञानच्या दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धा ऑफलाईन झाली.
विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सामाईक (MHT-CET) परिक्षेचा सराव व्हावा व संगणक प्रणाली वापरण्याचा अनुभव मिळावा हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी प्रा. एस. जे. पाटील (तज्ञ, भौतिकशास्त्र) यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी प्रा. बी. जी. मापारी (तज्ञ, गणित) व प्रा. डॉ. अमोल पाटील यांनी रसायनशास्त्र विषयावर मार्गदर्शन केले. व्याख्यान ऑनलाईन झाले. प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी ''अभियांत्रिकीमधील भविष्यातील संधी'' यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. एम. जी. मुल्ला यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
स्पर्धेमध्ये वेदांत इंचनाळकर याने प्रथम, वैभव गुरव याने द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेसाठी दोनशे गुणांची प्रश्नावली होती. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिकाचे वितरण केले. स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून प्रा. अमरसिंह फराकटे, प्रा. सचिन सनदी, प्रा. डॉ. अमोल माने यांनी काम पाहिले.