राजा शिवछत्रपती महाविद्यालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजा शिवछत्रपती महाविद्यालय
राजा शिवछत्रपती महाविद्यालय

राजा शिवछत्रपती महाविद्यालय

sakal_logo
By

01351

लघुउद्योग व किरकोळ व्यापारी
कोरोना महामारीत उद्ध्वस्त

डॉ. कोलीगुडे; राजा शिवछत्रपती महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

महागाव, ता. १४ : येथील राजा शिवछत्रपती महाविद्यालयात कोरोनाचा विविध क्षेत्रांवरील परिणाम विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र झाले. उद्घाटन संस्थाध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांच्या हस्ते झाले.
प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी मानव उद्यापासून महामारी, दुष्काळ, साथीचे रोग, सिंधू संस्कृतीपासून ते एकविसाव्या शतकातील कोरोनाच्या कालखंडाचा ऐतिहासिक आढावा घेतला.
राष्ट्रीय चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक विजापूर राणी चन्नम्मा विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख प्रो. डॉ. चंद्रकांत कोळीगुडे यांनी, देशातील लघुउद्योग कुटिरोद्योग व किरकोळ व्यापाऱ्यांवर प्रतिकूल प्रभाव पडला आहे. याला कोणीही अपवाद नाहीत. मानवी जीवनाची न भरून निघणारी हानी झालेली आहे, असे मत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रातील प्रमुख मार्गदर्शक गोवा विद्यापीठांतर्गत कार्यरत डॉ. नंदकुमार सावंत यांनी कोविड महामारीमुळे शिक्षण क्षेत्रावर अतिशय दूरगामी परिणाम झाले आहेत, असे सांगितले.
चर्चासत्रात प्रा. धर्मवीर क्षीरसागर, डॉ. वैजनाथ सूर्यवंशी, प्रा. सचिन जानवेकर, प्रा. दिलीप काळे यांनी संशोधन पेपरचे वाचन केले. सूत्रसंचालन डॉ. रचना मुसाई, डॉ. सुगंधा घरपणकर, प्रा. संजीवनी कदम यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. वैजनाथ सूर्यवंशी यांनी करून दिली. आभार प्रा. डी. जी. कापुरे यांनी मानले. कार्यशाळेची यशस्विता प्रा. संदीप इंगळे, डॉ. सुकुमार आवळे, प्रा. वनिता विरकर, प्रा. एन. आर. पाटील, प्रा. किशोर पाटील, प्रा. वैशाली पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेस देशभरातून ५६ संशोधकांनी पेपर पाठवले असून १२५ प्राध्यापक, विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेतला.