महात्मा फुले विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

महात्मा फुले विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

01357
महागाव ः महात्मा फुले विद्यालयासाठी एक लाख रुपयांची रोख रक्कम प्राचार्य आय. एस. पाटील यांच्याकडे अजयसिंह किल्लेदार आदिंनी दिली.
--------
महात्मा फुले विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
महागाव, ता. १५: महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात १९९९-२००० व २००२-२००३ मधील माजी विद्यार्थी मेळावा झाला. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात शनिवारी १९९९-२००० व रविवारी २००२-२००३ या वर्षातील माजी विद्यार्थी एकत्र आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य आय. एस. पाटील तर प्रमुख उपस्थितीत संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील होते.
माजी मुख्याध्यापक एन. आर. फडके, सी. टी. गडकरी, सदानंद जगंम, महादेव गोरुले, ए. आर. देसाई, एल. एस. जांबुटकर, बाबुराव कोले, दत्ता राणे, नारायण कांबळे, भिमराव चिगरे आदी शिक्षक उपस्थित होते. माजी विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. २००२-२००३ मधील माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सुरपेटी व १९९९-२००० मधील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वस्तू भेट दिल्या. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे काही तरी देणे आहे. शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर करिअर करता आले म्हणून शाळेचा माजी विद्यार्थी अजयसिंह किल्लेदार यांनी शाळेसाठी एक लाख रुपयांची रोख रक्कम देणगी स्वरुपात दिली. मोहन कांबळे, नारायण होडगे, शांताराम वाघराळकर, महेश पाटील, किरण पाटील, रमेश कळविकट्टे, एकता पाटील, सुवर्णा सावंत आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com