Sat, Sept 30, 2023

‘शिवछत्रपती’मध्ये कापुरे यांचे व्याख्यान
‘शिवछत्रपती’मध्ये कापुरे यांचे व्याख्यान
Published on : 17 May 2023, 4:04 am
‘शिवछत्रपती’मध्ये
कापुरे यांचे व्याख्यान
महागाव ः संपूर्ण जगाला भेडसावणारे अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहेत. महापूर, दुष्काळ, खनिज साधन संपत्तीची कमतरता याला आळा घातला नाही, तर पुढची पिढी सुखाने जगणार नाही. पुढच्या पिढीला आपण सुखी समृद्धी ठेवायचे असेल तर शाश्वत विकासासाठी नैसर्गिक ऊर्जा साधनाचा वापर करावा लागेल, असे प्रतिपादन प्रा. डी. जी. कापुरे यांनी केले. ते महागाव येथील राजा शिवछत्रपती महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित व्याख्यानात बोलत होते. प्राचार्य डॉ. निवास जाधव यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना समितीचे प्रमुख प्रा. दिलीप काळे यांनी केले. स्वागत प्रा. डॉ. सुगंधा घरपणकर यांनी केले. आभार प्रा. डॉ. के. पी. देशमुख यांनी मानले.