
आप्पाचीवाडी ते मेतके येथिल बाळूमामा मंदिरापर्यंत भक्तीयात्रा उत्साहात.
19205
आप्पाचीवाडी-मेतके भक्तियात्रा
गावोगावी सडा-रांगोळीने स्वागत; परिवर्तन सामाजिक संस्था, बाळूमामा ट्रस्टतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. ३ : हालसिद्धनाथ महाराज की जय... बाळूमामांच्या नावाने चांगभल... ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम असा अखंड नामघोष... भगव्या पताका.... टाळ-मृंदगाचा गजर करत श्री क्षेत्र आप्पाचीवाडी ते मुळक्षेत्र मेतके येथिल बाळूमामा मंदिरापर्यंत भक्तीयात्रा (पायी दिंडी) उत्साहात झाली.
अक्षयतृतीयेच्या निमित्ताने कौलगे (ता. कागल) येथिल परिवर्तन सामाजिक संस्था व मेतके येथिल बाळूमामा ट्रस्टतर्फे आयोजित दिंडी सोहळ्यात सीमाभागातील २५ हून अधिक गावातील वारकऱ्यांसह भाविक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील घुमट मंदिरात नाथांची परिवर्तनचे प्रमुख हभप सचिन पवार (पुणे), मेतके ट्रस्टचे प्रमुख पापा पाटील-कौलवकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह भोसले, दयानंद पाटील, बळीराम मगर आदींच्या हस्ते पूजा झाली. म्हाकवेपासूनच दुतर्फा रांगोळ्या काढल्या. बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले. आणूरमध्ये फुलघड्या टाकून स्वागत झाले. सजविलेल्या रथात तुकाराम गाथा व ज्ञानेश्वरी ठेवली. गावागावात रथासमोर दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. बस्तवडे येथील वेदगंगा नदीतीरावर दुपारचे जेवण व थोडा विसावा घेण्यात आला. जेवणाची व्यवस्था बस्तवडे ग्रामस्थांनी केली.
हमिदवाडा ग्रामस्थांनी दिंडीचे रांगोळ्या काढून जोरदार स्वागत केले. तर तेथून मुळक्षेत्र मेतके येथिल चिकोत्रा नदीकाठावर या दिंडी सोहळ्यात अनेक भाविक सहभागी झाले. तीन हजारांहून अधिक भाविकांचा लवाजमा बाळूमामा मंदिरात पोहचताच मंदिर परिसर फुलून गेला. सचिन पवार यांची किर्तनसेवा झाली. त्यानंतर बाळूमामा ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे वाटप होवून दिंडी सोहळ्याची सांगता झाली.
‘परिवर्तन’चे नेटके संयोजन
परिवर्तन संस्थेचे ७० हून अधिक स्वयंसेवकांनी काटेकोर नियोजन केले. एक ते दीड हजारांपर्यंत भाविक सहभागी होण्याचा अंदाजाने नियोजन केले. मात्र प्रत्यक्षात तीन हजाराहून अधिक भाविक सहभागी झाले. तरीही संयोजकांनी कोणतीही उणीव भासू दिली नाही.
कोट
संत बाळूमामा हे वारकरी सत्पुरुष होते.त्यांनी आपले साधुत्व बाजारी होऊ दिले नाही.अशा थोर संतांना व त्यांचे दैवत असणाऱ्या श्री हालसिद्धनाथ यांना वंदन करण्यासाठी ही पायी भक्ती यात्रा यापुढे प्रत्येक अक्षयतृतीयेच्या निमित्ताने आयोजित करण्याचा मानस आहे.
सचिन पवार, संत साहित्याचे अभ्यासक
Web Title: Todays Latest Marathi News Mhk22b02594 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..