ज्ञानाच्या आधारे जीवनाचे ध्येय साधता येते परमात्मराज महाराज : आडी दत्त देवस्थान मठात प्रवचन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानाच्या आधारे जीवनाचे ध्येय साधता येते  परमात्मराज महाराज : आडी दत्त देवस्थान मठात प्रवचन
ज्ञानाच्या आधारे जीवनाचे ध्येय साधता येते परमात्मराज महाराज : आडी दत्त देवस्थान मठात प्रवचन

ज्ञानाच्या आधारे जीवनाचे ध्येय साधता येते परमात्मराज महाराज : आडी दत्त देवस्थान मठात प्रवचन

sakal_logo
By

03625
आडी : येथील संजीवनगिरी श्री दत्त देवस्थान मठात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमात्मराज महाराज.

"ज्ञानाच्या आधारे जीवन ध्येय साधता येते’

म्हाकवे, ता.१७: मनुष्याला पूर्ण आयुष्य मिळवण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जीवनाचे पारमार्थिक उद्दिष्ट साध्य करता यावे, यासाठी पारमार्थिक साधना आवश्यक आहे. पुण्य ज्ञानाच्या आधारे जीवनाचे ध्येय साधता येते, असे परमात्मराज महाराज यांनी सांगितले. ते आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी श्री दत्त देवस्थान मठात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.
सकाळी श्री दत्तगुरूंच्या पादुकांवर अभिषेक अर्पण करण्यात आला. भाविकांच्या उपस्थितीत महाआरती झाली.
परमात्मराज महाराज म्हणाले, " पुण्य आणि ज्ञानसंचयरुपी मित्र मृत्यूनंतरही सोबत करीत असतो. धनरुपी मित्र जिवंत असे पर्यंत साथ देतो. कुटुंबरुपी मित्र मृत्युनंतर अंत्यविधी पर्यंत साथ देतो. जीवनाचा अवधी, सामर्थ्य बळ
म्हणजे आयुष्य होय.
परमार्थिक साधनेसाठी वेळ नाही असे म्हणून नका. दगड गोट्या वाळूने गच्च भरलेल्या पात्रांमध्ये जागा नसली तरीही त्यामध्ये थोडे पाणी ओतता येते. त्याप्रमाणे संसारिक धावपळीच्या जीवनात अध्यात्मिक जीवनरुपी जल भरावयास हवे. जीवनात थोडा तरी वेळ अध्यात्मिक साधनेसाठी देणे गरजेचे आहे.आयुष्याचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. व्यवहारिक जीवनात अभ्यासाची गरज आहे. त्याचप्रमाणे अध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यास म्हणजे जप-तप साधनेचा अभ्यास आवश्यक आहे."
निपाणी येथील विनायक आंबले यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. शिवराज माने (मांगुर), महादेव वाळके (अकिवाट), राजश्री चौगुले (कोल्हापूर), जयश्री हरेर (आडी), डॉ. बी ए माने (भोज), सुनील कवठे (कागल), डॉ. सदाशिव तंगडे (बेनाडी) यांचा परमात्मराज महाराज, देविदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Mhk22b02610 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top