टडे २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टडे २
टडे २

टडे २

sakal_logo
By

फोटो
सरपंच सुभाष भोसले

पिराचीवाडी राज्याच्या नकाशावर
आणणारे सरपंच सुभाष भोसले

जिल्ह्यात हमालांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या कागल तालुक्यातील पिराचीवाडीने लोकनियुक्त सरपंच सुभाष भोसले यांच्या पुढाकाराने विकास कामांच्या माध्यमातून आपले नाव राज्याच्या नकाशावर कोरले आहे. दुर्गम, डोंगराळ सोयी-सुविधांअभावी वंचित असलेल्या या गावात श्री. भोसले यांनी विकास कामांचा डोंगर रचत इतरांना आदर्श घालून दिला. कायम हसतमुख,निगर्वी,विकासकामांच्या ध्येयाने पछाडलेल्या  सुभाष भोसले यांचा आज वाढदिवस आहे.त्या निमित्ताने..
- रमेश पाटील, म्हाकवे.

प्रतिकुल परिस्थितीतीची जाणिव असलेल्या सुभाष भोसले यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत भाग घेतानाच आपले गाव विकासकामांचे एक ''मॉडेल'' बनवायचे आहे अशी मनासी खूणगाठ बांधली होती. पिराचीवाडी येथे विकासकामेपाहण्यासाठी जिल्ह्यासह बाहेरील लोक, पदाधिकारीही भेटी देतात. सरपंच भोसले यांनी कोट्यावधीचा निधी खेचून आणला. वैकुंठभुमी, गावची सुसज्ज आणि सर्व सोयीनयुक्त ग्रामपंचायत इमारत, गावात सीसी टीव्ही कँमेरे, सर्वच गल्लीत दुतर्फा झाडे व ठिंबक सिंचन, बंदिस्त गटारे, ऐतिहासिक तलावाचे काम, कुस्ती मैदान, श्री दत्त मदिर, सोलर वॉटर पाणी योजना, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, अंगणवाडी, मस्जिद, शिवसृष्टी, हायमास्ट लाईट व सोलर लाईट यासह सरपंच भोसले यांनी स्वखर्चाने नदीतून तीन टप्प्यात साकारलेली पाणी योजना यामुळे गावचे रुपडेच पालटले आहे.आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव हा जिल्हास्तरावरील पुरस्कार मिळालेले कागल तालुक्यातील हे एकमेव गाव ठरले आहे. याशिवाय गरजुंसाठीच्या शासनाच्या योजनांच्या माध्यमातून केलेले कार्यही कौतुकास्पद आहे. केवळ राजकीय क्षेत्रातच नाही तर सामाजिक, शेक्षणिक, व धार्मिक क्षेत्रातील गावासाठीचे योगदान मोठे आहे. गावच्या विकासकामातून भोसले यांनी व्यक्तिमत्वाचा वेगळा ठसा निर्माण केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mhk22b02635 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top