शालेय विद्यार्थ्यांसाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना : अपघाती मृत्यू दिड लाख सानुग्रह अनुदान :पहिली ते बारावी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शालेय विद्यार्थ्यांसाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना : अपघाती मृत्यू दिड लाख सानुग्रह अनुदान :पहिली ते बारावी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा निर्णय
शालेय विद्यार्थ्यांसाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना : अपघाती मृत्यू दिड लाख सानुग्रह अनुदान :पहिली ते बारावी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा निर्णय

शालेय विद्यार्थ्यांसाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना : अपघाती मृत्यू दिड लाख सानुग्रह अनुदान :पहिली ते बारावी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाचा निर्णय

sakal_logo
By

शालेय विद्यार्थ्यांसाठी सुधारित योजना
अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाखाचे सानुग्रह अनुदान; शिक्षण विभागाचा निर्णय

रमेश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. ५ : वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या सर्व बाबींचा विचार करून शासनाने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. अपघातामुळे विद्यार्थ्याला कायमचे अपंगत्व (दोन अवयव / दोन डोळे किंवा एक अवयव व एक डोळा निकामी) आल्यास १ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान, अपघातामुळे कायमचे अपंगत्व (एक अवयव किंवा एक डोळा कायम निकामी) आल्यास ७५ हजार रुपयांचे अनुदान, विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये अनुदान, विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास १ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान तसेच विद्यार्थी कोणत्याही कारणाने (क्रीडा स्पर्धेत खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून, आगीमुळे, विजेचा धक्का, वीज अंगावर पडून) जखमी झाल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांची आहे.
योजनेतील प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येत आहे. या समितीसमोर इयत्ता पहिली ते आठवी व इयत्ता नववी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींकरिता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची राहील.


चौकट
हे महत्त्वाचे...
विद्यार्थ्याचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांपैकी विद्यार्थ्याची आई, विद्यार्थ्याची आई हयात नसल्यास वडील किंवा विद्यार्थ्याची आई वडील हयात नसल्यास १८ वर्षांवरील भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक यांना या प्राधान्य क्रमानुसार सानुग्रह अनुदानाची रक्कम या योजनेअंतर्गत अदा केली जाईल.

चौकट
या बाबींचा समावेश नाही
-आत्महत्येचा प्रयत्न करणे
-आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे
-गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
-अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात
-नैसर्गिक मृत्यू, मोटार शर्यतीतील अपघात

Web Title: Todays Latest Marathi News Mhk22b02664 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top