म्हाकवेत शाही पद्धतीने दसरा उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाकवेत शाही पद्धतीने दसरा उत्साहात साजरा
म्हाकवेत शाही पद्धतीने दसरा उत्साहात साजरा

म्हाकवेत शाही पद्धतीने दसरा उत्साहात साजरा

sakal_logo
By

03950
म्हाकवे : (ता कागल) येथे दसऱ्यानिमित्त हालसिद्धनाथ, हनुमान देवाची निघालेली पालखी मिरवणूक

म्हाकवेत शाही पद्धतीने दसरा
म्हाकवे ः येथील दसरा शाही पध्दतीने झाला. दहा दिवस दररोज पालखी मिरवणूक मानकरी असलेले बाळासाहेब पाटील, दिलीप पाटील, सुखदेव पाटील, कृष्णा पाटील, अशोक पाटील यांच्या उपस्थितीत झाली. दसऱ्या दिवशी श्री हालसिद्धनाथ, श्री हनुमान आधी देवांच्या पालखीची मिरवणूक काढली. गाववेशीबाहेर दोन्ही पालखी आल्यानंतर शमीपूजन बाळासो पाटील, सुखदेव पाटील, दिलीप पाटील, अशोक पाटील, कृष्णा पाटील, डी. एच. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ढोल कैताळ, पालखी छत्र्यांसह भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक काढली. यावेळी नागरिकांनी सोने लुटले. पौरोहित्य दत्ता जोशी यांनी केले.