शिक्षणक्रांतीमुळेच भारत महासत्ता बनेल : हसन मुश्रीफ : गोरंबेत देशातील पहिल्या फ्युच्युरिस्टीक क्लासरूमच्या लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणक्रांतीमुळेच भारत महासत्ता बनेल  : हसन मुश्रीफ : गोरंबेत देशातील पहिल्या फ्युच्युरिस्टीक क्लासरूमच्या लोकार्पण
शिक्षणक्रांतीमुळेच भारत महासत्ता बनेल : हसन मुश्रीफ : गोरंबेत देशातील पहिल्या फ्युच्युरिस्टीक क्लासरूमच्या लोकार्पण

शिक्षणक्रांतीमुळेच भारत महासत्ता बनेल : हसन मुश्रीफ : गोरंबेत देशातील पहिल्या फ्युच्युरिस्टीक क्लासरूमच्या लोकार्पण

sakal_logo
By

03977

म्हाकवे ः फ्युच्युरिस्टीक क्लासरूमचे लोकार्पण करताना आमदार मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे, संजयसिंह चव्हाण, अंबरिशसिंह घाटगे, संदीप गुंड आदी. )(छायाचित्र ः साताप्पा चव्हाण, बेनिक्रे)
-----------------------
शिक्षणक्रांतीमुळेच भारत महासत्ता बनेल
आमदार मुश्रीफ ; गोरंबेत फ्युच्युरिस्टीक क्लासरूमचे लोकार्पण

म्हाकवे, ता.१२ : शिक्षणक्षेत्रात तंत्रज्ञानाचा परिपूर्ण अवलंब होणे काळाची गरज आहे. शिक्षणक्रांतीमुळे पाच वर्षांत देश महासत्ता बनेल, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
गोरंबे (ता.कागल) येथे देशातील पहिल्या फ्युच्युरिस्टीक क्लासरूमच्या लोकार्पण सोहळा झाला. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय घाटगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते
संजय घाटगे म्हणाले, ‘सरपंच शोभा पाटील यांच्या प्रयत्नातून गोरंबेसारख्या डोंगराळ भागात देशातील पहिली शिक्षणप्रणाली कार्यान्वित झाली, ही बाब अभिमानास्पद आहे. येथील मुले अद्ययावत शिक्षण घेऊन जगाला आव्हान द्यायला सज्ज होतील.’मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, ‘शिक्षणात सर्वच पातळयांवर जिल्हा अग्रेसर आहेच. गोरंबे प्राथमिक शाळेतील शैक्षणिक गरुडझेप कौतुकास्पद आहे.’
शिवाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गोकुळचे संचालक अमरिश घाटगे,जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अरुण जाधव, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, गटशिक्षणाधिकारी डॉ. जी. बी. कमळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, दत्ता पाटील-केनवडेकर, सरपंच शोभा पाटीलसह शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. विवेक गवळी यांनी सूत्रसंचालन केले.
---