जाहिरात संस्था बातमी आवश्यक म्हाकवेतील तु.रा.पाटील दूध संस्थेकडून साडेतीन लाख रुपये बोनस वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात संस्था बातमी आवश्यक   म्हाकवेतील तु.रा.पाटील दूध संस्थेकडून साडेतीन लाख रुपये बोनस वाटप
जाहिरात संस्था बातमी आवश्यक म्हाकवेतील तु.रा.पाटील दूध संस्थेकडून साडेतीन लाख रुपये बोनस वाटप

जाहिरात संस्था बातमी आवश्यक म्हाकवेतील तु.रा.पाटील दूध संस्थेकडून साडेतीन लाख रुपये बोनस वाटप

sakal_logo
By

पाटील संस्थेचा साडेतीन लाख बोनस
म्हाकवे : येथील तुकाराम रामजी पाटील दूध संस्थेने दूध उत्पादक सभासदांना साडेतीन लाखांचा बोनस वाटप केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच धनंजय पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून शाहू साखरचे संचालक पी. डी. चौगुले होते. संस्थेने म्हैस दुधास शेकडा १६ टक्के तर गाय दुधास शेकडा ११ टक्के बोनस दिला. म्हैस दुधामध्ये प्रथम आलेल्या निवृत्ती चौगुले, राजाराम पाटील, राजाराम कुंभार तर गाय दुधामध्ये प्रथम आलेल्या राजाराम कुंभार, सागर पाटील, बाळासो पाटील यांचा भेटवस्तू देऊन सत्कार झाला. रवींद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रकाश कांबळे, पांडुरंग पाटील, सदानंद चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अण्णासो चौगुले, अजित पाटील, संग्राम पाटील उपस्थित होते. अरुण पाटील यांनी आभार मानले.