अन्नपुर्णा’ शुगरचे ऊस बील शेतकऱ्यांच्या बँक खाते जमा : साडेपाच कोटी रुपये : चेअरमन संजय घाटगे यांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अन्नपुर्णा’ शुगरचे  ऊस बील शेतकऱ्यांच्या बँक खाते जमा : साडेपाच कोटी रुपये : चेअरमन संजय घाटगे यांची माहिती

sakal_logo
By

04043

‘अन्नपजूर्णा’चे ऊस
बिल जमा : घाटगे

म्हाकवे,ता.१६ : केनवडे (ता.कागल) येथील श्री अन्नपूर्णा शुगर कारखान्याने गाळपासाठी आलेल्या ऊसाला प्रतिटन २९२१ रूपयेप्रमाणे एकरकमी ऊस बिल ५ कोटी ५२ लाख ४८ हजार रूपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केले असल्याची माहिती चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी दिली.
श्री. घाटगे म्हणाले, ‘‘केमिकल फ्री गुळपावडर व सल्फर लेस खांडसरी साखर उत्पादित करणाऱ्या अन्नपुर्णा शुगर कारखान्याने अल्पावधीतच नावलौकीक मिळवले आहे. आरोग्यदायी नैसर्गिक गुळपावडर, खांडसरी साखर उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. कारखान्याचा दुसरा गाळीत हंगाम असून गतवर्षी कारखान्याने ऊस, तोडणी वाहतुकीची सर्व बिले आदा केली आहेत. चालू गळीत हंगामात इतर कारखान्यांच्या जवळपास ऊसदर दिला असून गतवर्षी प्रमाणे शेतक-यांनी गळापासाठी जास्तीत जास्त ऊस पाठवावा."