Sun, Jan 29, 2023

व्हनाळी येथील श्रीधर गुरवची यशाला गवसणी : राज्य कर निरिक्षकपदी निवड
व्हनाळी येथील श्रीधर गुरवची यशाला गवसणी : राज्य कर निरिक्षकपदी निवड
Published on : 1 December 2022, 2:16 am
04059
व्हनाळीतील श्रीधर गुरव करनिरीक्षक
म्हाकवे : व्हनाळी (ता. कागल) येथील श्रीधर सूर्यकांत गुरव यांची एमपीएससी परीक्षेतून राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली. प्राथमिक शिक्षण जि.प. शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण मानव हायस्कूल शेंडूर तर पदवीचे शिक्षण डी.आर.माने महाविद्यालय, कागल येथे झाले. त्यांनी स्वतःच्या मशीनशॉपमध्ये काम करत एमबीएला प्रवेश घेतला. काम आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींना वेळ देणे शक्य नव्हते. त्यामुळे पुढील शिक्षण थांबवत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. चौथ्या प्रयत्नाच त्याला यश मिळाले. त्याला आई सुवर्णा, वडील सूर्यकांत यांचे मार्गदर्शन मिळाले. यशाबद्दल श्रीधर म्हणाला, ‘संघर्षातून मिळवलेले यश चिकाटी आणि सकारात्मकता वाढविणारे आहे. अविरत कार्यरत राहण्याचे ध्येय ऊर्जा देणारे आहे.’