सुधारित कागलात सव्वीस पैकी अठरा ठिकाणी सरपंच पदासाठी थेट दुरंगी लढत : तालुक्यात मुश्रीफ-संजय घाटगे गटाच्या विरोधात मंडलिक- राजे युती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधारित    कागलात सव्वीस पैकी अठरा ठिकाणी सरपंच पदासाठी थेट दुरंगी लढत : तालुक्यात मुश्रीफ-संजय घाटगे गटाच्या विरोधात मंडलिक- राजे युती

sakal_logo
By

कागल
रमेश पाटील

स्थानिक गटांत पडली फूट
म्हाकवे, ता. १२ : कागल तालुक्यातील सव्वीस ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीस सुरुवात झाली. तालुक्यात बहुतांशी ठिकाणी खासदार संजय मंडलिक व राजे समरजितसिंह घाटगे गट एकत्र आले आहेत तर विरोधात आमदार हसन मुश्रीफ व संजय घाटगे गट असे लढतीचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील गटांतर्गत दुफळीमुळे एकाच गटातील काही कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात लढतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. २६ ग्रामपंचायतीपैकी १८ ठिकाणी दुरंगी लढत असणार आहे. सरपंच पदासाठी ६५ उमेदवार रिंगणात आहेत. १८ ठिकाणी महिलांसाठी सरपंच पदाचे आरक्षण आहे. हमिदवाडा येथे मंडलिक-मुश्रीफ संजय घाटगे गट एकत्र आले असून, विरोधात समरजितसिंह घाटगे यांच्या गटाने पॅनेल उभे केले आहे. तर सेनापती कापशी येथे मुश्रीफ गटाच्या विरोधात मंडलिक, संजय घाटगे व समरजितसिंह घाटगे गट एकत्र आले आहेत. तर आनूर येथे मंडलिक-मुश्रीफ गट एकत्र निवडणूक लढवत असून, विरोधात दोन्ही घाटगे गट आहेत.