साके येथे केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात : तेरा शाळांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साके येथे केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात : तेरा शाळांचा सहभाग
साके येथे केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात : तेरा शाळांचा सहभाग

साके येथे केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात : तेरा शाळांचा सहभाग

sakal_logo
By

04089
साके : येथे सांस्कृतिक स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी विस्ताराधिकारी सारिका कासोटे, मुख्याध्यापक भानुदास पवार व अन्य.
---

साकेत केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा
म्हाकवे : साके (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा झाल्या. शेंडूर केंद्रशाळेंतर्गत तेरा शाळांतील विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग होता. लहान व मोठा अशा दोन गटांत स्पर्धा झाल्या. स्पर्धेत प्रश्नमंजूषा, समूहगीत, समूहनृत्य, नाट्यीकरण, कथाकथन आदी सांस्कृतिक कार्यक्रम झाले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. सिद्धनेर्ली, एकोंडी, बामणी, व्हनाळी, शेंडूर, वंदूर रामकृष्णनगर आदी शाळांनी वरिष्ठ, कनिष्ट गटातील क्रमांक पटकवले. विजेत्या संघांना प्रशस्तीपत्र, शिल्ड देऊन गौरविले. उद्घाटन बाळासाहेब तुरंबे, सागर लोहार यांच्या हस्ते झाले. सुभाष चौगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विस्तार अधिकारी सौ. सारिका कासोटे व केंद्रप्रमुख सौ. सुनीता किणेकर, मुख्याध्यापक भानुदास पवार, रेखा पोतदार, विजय पाटील, सुनंदा कोरवी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले.