Sun, Jan 29, 2023

प्रमोद कांबळे यांना युवाभूषण पुरस्कार
प्रमोद कांबळे यांना युवाभूषण पुरस्कार
Published on : 30 December 2022, 4:04 am
प्रमोद कांबळे यांना युवाभूषण पुरस्कार
म्हाकवे : आनुर (ता. कागल) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कांबळे यांना लोकराजा शाहू प्रेरणा युवा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इचलकरंजी येथील लोकराजा शाहू महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष निकम होते. अरुण कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास उद्योजक राम पुरोहित, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक संजय कांबळे, संजय टाकळीकर, संतोष जावीर उपस्थित होते. अनिल गोरंबेकर यांनी सूत्रसंचालन, अक्षरा कांबळे यांनी आभार मानले.