Sun, Feb 5, 2023

आनुर उपसरपंचपदी ऋषिकेश देवडकर
आनुर उपसरपंचपदी ऋषिकेश देवडकर
Published on : 13 January 2023, 1:48 am
04158
आनुर उपसरपंचपदी ऋषिकेश देवडकर
म्हाकवे : आनूर (ता. कागल) ग्रामपंचायत उपसरपंचपदी समरजितसिंह घाटगे गटाचे ऋषिकेश देवडकर यांची निवड झाली. उपसरपंचपदाचे नाव प्रवीण रामगोंडा पाटील यांनी सुचवले. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच काकासाहेब सावडकर होते. सभेस नूतन सदस्य मीनाक्षी लोहार, ज्ञानेश्वरी कोळी, विजय पाटील, विजय खोत, अश्विनी तोडकर, सुहास लोकरे, संगीता माने, विद्या कांबळे उपस्थित होते. सावंता देवडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रीपती खोत, सुनील दळवी, भाऊसो लोकरे, पुंडलिक सावडकर, रविकिरण सावडकर, सुरेश बेनाडे, अण्णासाहेब इंदलकर, केरबा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. के. बी. चौगुले यांनी आभार मानले.