बानगे येथील ७० एकरातील ऊस जळून खाक, शेती साहित्याचे नुकसान: रस्ता अडवणूकीचा फटका

बानगे येथील ७० एकरातील ऊस जळून खाक, शेती साहित्याचे नुकसान: रस्ता अडवणूकीचा फटका

4200

बानगे: (ता. कागल) येथील जळलेला ऊस. (छायाः सागर पाटील)
....

बानगेत ७० एकरांतील ऊस जळून खाक

शेती साहित्याचे नुकसान: रस्ता अडवणुकीचा फटका

म्हाकवे, ता.२९: बानगे (ता.कागल) येथील मळगे रस्त्याच्या उत्तरेस असलेल्या इनाम, सोनारकी पड पाणंद, गुजर नावाच्या शेत जमिनीतील ७० एकरांतील ऊस पीक जळून खाक झाले. यामध्ये उसासह, ठिबक सिंचन पाईप तसेच इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याअभावी चारशे एकरातील ऊस पडून आहे. रस्त्याचा प्रश्न न सुटल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस शेतातच पडून होता. तो आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.
आगीत तानाजी पाटील, महादेव पाटील, धनाजी पाटील, निलेश पाटील, विष्णू सावंत, तुकाराम सावंत,आनंदी जाधव, रामदास पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी (ता.२९) दुपारी बाराच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ग्रामस्थांनी तत्काळ बिद्री व हमिदवाडा कारखान्यांशी संपर्क साधून अग्निशामक बंब मागवून घेतले. मात्र हमिदवाडा कारखान्याचा अग्निशामक बंब गावात प्रवेश करतेवेळी बंद पडला. तर बिद्री कारखान्याचा अग्निशामक बंब जमिनीत ओलावा असल्यामुळे तोही अडकला. आग आटोक्यात आली नसल्याने ७० एकरांतील ऊस जळून खाक झाला
...


पाणंद रस्ता बंद केला नसता तर ...

गेली तीन महिने पाणंद रस्ता बंद असल्याने जळलेला सुमारे दहा हजार टन ऊस अद्याप शिल्लक होता. वाट नसल्याने हा ऊस शेतात तसाच होता. रस्त्याच्या वादात ऊस जळाला. रस्ता बंद केला नसता तर संपूर्ण ऊस तुटून गेला असता, अशी घटनास्थळी चर्चा होती.
---

चार जनावरे बचावली

आग लागलेल्या ऊस क्षेत्रानजीकच आनंदी जाधव यांचा चार जनावरांचा गोठा आहे. प्रसंगावधानता बाळगत सरपंच युवराज पाटील व सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील यांनी आपल्या मालकीचा बोअरवेल सुरू करून या गोठ्यासभोवती पाणी मारले. तर योगेश जमनिक, भगवान पाटील, शरद पाटील यांनी या जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com